
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील अनेक पाझर तलावांचे साठवण तलावात केलेले रूपांतर व जलसंधारण विभागाकडून होत असलेल्या कामाचे कौतुक करीत जलसंधारणच्या या कामाचे ‘माळशिरस मॉडेल’ राज्यभर राबविण्याची गरज असून लवकरच या बाबतीत जलसंधारण मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गारवाड मगरवाडी येथील शेतकऱ्यांशी सवांद साधताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून माळशिरस तालुक्यातील १७ तलावांच्या कामांसाठी भरीव निधी आणला होता अजून 13 तलावाच्या कामाची मंजुरी मिळणार आहे यांपैकी अनेक कामे पूर्वत्वास गेली असून या कामांची व तलावांची पाहणी जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी शनिवारी दि. ११ जून रोजी दुपार पासून रात्री उशिरापर्यंत केली. त्यानंतर त्यांनी गारवाड मगरवाडी,सुळेवाडी ,चांदापुरी,पठाणवस्ती ,पिलीव येथिल दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधला यावेळी
यावेळी गारवाड येथे शेतकऱ्यांशी सवांद करताना ना. पाटील पुढे म्हणाले, पीडिएन (बंद पाईपलाईन) द्वारे तलावातून थेट शेतकर्यांनाच्या शेतीत पाणी देण्याची उत्तमराव जानकर यांची कल्पना उत्कृष्ट असून यामुळे पाण्याच्या अपव्यय टाळला जाईल व शेतकऱ्यांचा मोठा प्रमाणात फायदा होईल. माळशिरस तालुक्यातील वीस ते बावीस गावे दुष्काळी पट्ट्यातील असून ती गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्या गावांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी. यासाठी तलावात अतिरिक्त पाणी नीरा उजवा कालव्यातून आणण्याचे नियोजन करून पावसाचे जादा व वाया जाणारे पाणी,नीरा उजव्या कालव्याच्या पाण्याची उपलब्धता पाहून ते पाणी आणता येईल का याबाबत अभ्यास करून आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल त्याचबरोबर पाझर तलावाचे साठवण तलाव करण्यासाठी आवश्यक जादाच्या निधीची तरतूद करण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक लावू त्याच्या मंजूर जानकर यांच्या कडे पाठवू असे ते यावेळी बोलताना म्हणाले
सदर पाहणी व सवांद दौरा माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी नियोजित केला होता यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे, जिल्हा नियोजन समिती सदस्यसुरेश आबा पालवे, जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे, पं स माळशिरसचे माजी सभापती मच्छीद्रआबा ठवरे, उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, माजी उपनगराध्यक्ष डॉ मारुती पाटील, माजी प स सदस्य मधुकर पाटील, गटनेते रणजित जाधव, पंचायत समिती सदस्य अजय सकट, पांडुरंग वाघमोडे,विकास धाइंजे, युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील गोरे, फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, युवराज झंजे, भानुदास सालगुडे पाटील, रमेश पाटील, सौरभ बागणवर, माजी नगरसेवक मारुती ( आप्पा ) देशमुख,डॉ तुकाराम ठवरे, गारवडचे उपसरपंच धनाजी मगर, आप्पा भांडे, नवनाथ मगर, सरपंच विष्णू नारनवर आरिफभाई पठाण, वैभव दडस,ओबीसीचे सोमनाथ पिसे,दादासाहेब पालवे,पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता संजय बोडके, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय एकतपुरे, पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी अनंत पासलकर, तसेच संबंधित गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळी पट्ट्यातील काम पाहून ना. पाटील भारावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी पुढाकार घेऊन दुष्काळी पट्ट्यात केलेले पाझर तलावांचे काम पाहून जलसंपदा मंत्री नामदार पाटील भारवले. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांनी पाझर तलावांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
जानकर यांना राज्यभर काम करण्याची संधी – ना.पाटील
कोळेगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना नामदार जयंत पाटील म्हणाले की, उत्तमराव जानकर यांना या टर्मला राज्यभर काम करण्याची संधी होती मात्र त्यांची ही संधी थोडक्यात हुकली तरीसुद्धा आम्ही सर्वजण जानकर यांच्या पाठीशी उभे असून येणाऱ्या काळात त्यांना पक्षाकडून मोठी संधी देणार असल्याचा सुतोवाच ना. पाटील यांनी यावेळी केला.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती