संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
इस्लामपूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक या शाखेच्या माध्यमातून कण्हेर येथील शेती व्यवसायाच्या विकासासाठी मोठे योगदान मिळाले असून यामुळे शेतक-याचे संपूर्ण आर्थकरण बदलत चालले असल्याचे मत भाजपाचे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी कण्हेर येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वितीने आयोजित करण्यात आलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.यावेळी सरपंच पोपट माने,सदस्य दतात्रय माने,सदाशिव देवकाते,शाखाधिकारी एस डी चव्हाण, आनंद शेंडगे, बँक मित्र ताई शेंडगे,दत्तू माने,प्रशांत थोरात ,किरण काळे,रियाज शिकलगार रेगुलर कर्जदार,खातेदार,ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना सरगर म्हणाले, या बँकेची शाखा इस्लामपूर येथे स्थापन झाले पासून कण्हेरच्या शेतक-याना शेती व शेतीच्या डेव्हलपमेंट साठी बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज वाटप करण्यात आले. यामाध्यमातून शेतक-याच्या शेतीसाठी आवश्यक असणा-या गरजा जसे कि विहिर,पाईपलाईन पूर्ण झाल्याने शेतीमध्ये विविध बारमाही पिके घेणे शक्य झाले. यामुळे शेतक-यांचे आर्थकरण बदलण्यास मोठा फायदा झाला असून अनेक शेतक-यांना बँकेच्या कर्जमाफी,व्याजसवलत योजना,शासकीय अनुदान योजना,ट्रकटर कर्ज अशा योजनेचा फायदा घेतला असून यासाठी बँके कडून हि वेळोवेळी सहकार्य मिळाले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकेच्या वतीने रेग्लूर कर्ज भरणा-या कर्जदारांचा सन्मान करण्यात आला.तसेच बँकेकडून देण्यात येणा-या विविध योजना बाबत या बँकेचे शाखाधिकारी एस डी चव्हाण माहिती देऊन जन जागृती केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद शेंडगे यांनी केले.तर आभार बँक मित्र ताई शेंडगे यांनी मानले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती