
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथील लघुपाटबंधारे उपविभागातील उपविभागीय अधिकारी खुदबुद्दीन काशिम शेख यांचा सेवानिवृत्ती सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी लघुपाटबंधारे उपविभागातील सेवानिवृत्त उपअभियंता व्ही.एम.मोरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
ते बोलताना म्हणाले, दुष्काळी भागात जन्माला येऊन, दुष्काळी तालुक्यात काम करून तालुका पाणीदार तयार केला. ते यासाठी खूप राबवले आहेत काम करताना प्रचंड मानसिक ताणतणावात काम करून पाणी योजनांचे पूर्ण केले. पाणी प्रश्नाची कठीण परिस्थिती कौशल्याने हाताळली.असे काम करणाऱ्यांना श्रेय द्यायला हरकत नाही. रोजगार हमीपासून ते बंदिस्त पाईपलाईनपर्यंत त्यांनी कामे केली. सेवेत त्यांनी आनंददायी काम केले आहे.
आटपाडी तालुका अर्थक्रांती जेष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार व पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अरविंद चांडवले शुभेच्छा देताना म्हणाले, शेख यांच्यातील हसत खेळत वृत्तीचे कौतुक करावे वाटते.त्यांच्यात नकार हा शब्द आला नाही.आपल्या कारकिर्दीत अभ्यासपूर्ण प्रयोग राबवले.आपुलकीची माणसे जात, पात, धर्म ,पंथ यांना न मानतात कार्य करतात, त्यांनी या पद्धतीने सिंचन विकासाची काम केले.
सिंचन विभागाचे कालवा निरीक्षक दिपक मोरे म्हणाले, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये त्यांनी कधी फरक केला नाही. त्यांनी सर्वांना सामावून घेऊन काम केले. अवघड कामाचे ते सोलुशन काढून ते मार्गाला लावत होते.कोणत्याही कामाच्या बाबतीत ते गुणवंत होते.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमेय शिंदे म्हणाले, तालुक्यातील बंद पाइपलाइनचे काम पूर्णत्वाला नेले. त्यांनी अनेक वेगवेगळ्या योजना मार्गस्थ लावल्या.
पाटबंधारे सिंचन विभागाचे शाखाधिकारी महेश पाटील म्हणाले, शेख साहेब अवघड कामावर मार्ग काढत होते.
रफिक शेख म्हणाले,गोड बोलून काम करून घेण्याची लकब ज्या माणसांमध्ये असते, तो चांगली कामे करून घेतो.
सत्काराला उत्तर देताना के-के शेख म्हणाले,दुष्काळाची, रोजगार हमी कामे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची कामे, यासारखे सर्व कामे करण्याची संधी मिळाली. आयुष्यात चांगली चांगली कामे केली. संस्कार केले. तर्कसंगत आणि चांगल्या गोष्टीचा वापर केला. सर्वसामान्य माणसाकडून प्रेरणा घेतली. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बॉसिंग करायचे नाही ही आर.आर.आबांकडून प्रेरणा घेतली.भविष्यकाळात खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी सदैव पाठीशी राहुन त्यांच्या हाकेला हाक देणार आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भारत मोरे यांनी आभार मानले.वरिष्ठ लिपिक बजरंग हाके यांनी शुभेच्छा दिल्या.
सी.एम.पाटील, धावडवाडीचे माजी सरपंच चंदुलाल शेख, माजी उपसरपंच यासीन शेख, हाजी आय्याज शेख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी शाखाधिकारी रमजान शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य महिबूब सय्यद, युवा नेते आरिफ शेख, यशवंतराव चव्हाण विद्यालय मौजे डिग्रज येथील रफिक गुलाब शेख,शाखा अभियंता महेश पाटील,नंदकुमार गळवे, हणमंत जाधव,काका जाधव, दत्तात्रय जाधव,शोभा गोसावी, सांगोलकर मॅडम,अरुण गायकवाड, इस्माईल शेख, आदी मान्यवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती