

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
महाराष्ट्र राज्य कास्टट्रईब कर्मचारी संघटना जिल्हा शाखा-सांगली यांचेमार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या नावाने देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ.स्वाती सुरेश कोळी उपशिक्षिका सिटी हायस्कूल,सांगली यांना जाहीर झाला. क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून सांगली येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार सौ.स्वाती सुरेश कोळी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळालेच्या आनंदाप्रित्यर्थ श्री.सुरेश भिमराव कोळी व सौ.स्वाती सुरेश कोळी यांचेकडून हिवतडमधील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त व्यक्ती,वयोवृध्द व समाजबांधव इत्यादी मान्यवरांचा सत्कार व सर्वांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण पथक सातारा येथील प्राचार्य डॉ.श्री.विकास सलगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमांसाठी हिवतडच्या लोकनियुक्त सरपंच सौ.रुपालीताई सरगर,पोलिस पाटील अरुणकुमार सुतार,मुंबई पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक शिवाजीराव मंडले,कन्या प्रशाला कवठेमहाकांळ येथील प्रा.गुरव सर व हिवतड गावांतील जेष्ठ नागरिक,सेवानिवृत्त शिक्षक,व समाजबांधव उपस्थित होते.
याप्रसंगी सुरवातीला आप्पासाहेब कोळी यांनी ईशस्तवन करुन कार्यक्रमांची सुरुुवात केली.त्यानंतर सुरेश कोळी यांनी या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सांगितला. याप्रसंगी कोळी सर म्हणाले की,आम्ही नोकरीनिमित्त परगावी होतो.त्यामुळे आम्हाला गावी येता येत नव्हते. म्हणून आम्ही गावाच्या मातीपासून गावाच्या लोकांपासून दूरवर गेल्यासारखे वाटत होतो, यांची खंत आमच्या मनामध्ये सारखी बोचत होती. यातूनच गावाकडच्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संधीची वाट पाहत होतो. ती संधी आज मिळाली असून आदर्श शिक्षिका पुरस्काराचे निमित्ताने जेष्ठ नागरिकांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उददेशाने हा छोटेखानी कार्यक्रम ठेवणेत आला आहे.यानिमित्ताने गावांच्या मातीशी आमची नाळ यापुढे कायमपणे जोडली जावी आणि आमच्या आईवडीलांच्या बरोबरीने ज्यांनी आम्हाला आमच्या लहानपणी जपले, मायेचे चार शब्द भरविले व आम्हाला घडवण्यात खारीचा वाटा उचलला. आम्हाला चांगली शिकवण दिली, त्या लोकांमध्ये आम्हाला मिसळता यावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून यापुढेसुध्दा भविष्यात आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबविणार असलेचे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.सलगर बोलताना म्हणाले,आजच्या काळात ज्या कुटुंबात तीन पिढ्या एकञ गुण्यागोविंदाने नांदतात, तेच खरे श्रीमंत कुटुंब असून यालाच पैशापेक्षा खरी श्रीमंती म्हणावी लागेल.पैशापेक्षा माणूसकीची श्रीमंती फार श्रेष्ठ आहे.आत्ताच्या काळात पैशापेक्षा जोडलेली माणसे व माणुसकी कामाला येत असते.आत्ताच्या युवकांनी नुसता पैसा न पाहता कुटुंब एकञ ठेवण्याचे काम केले पाहीजे,तरच समाजव्यवस्था टिकून राहील.त्यांनी सर्व उपस्थित जेष्ठ नागरिकांची मने जिंकली.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक रंगराव कदम (बापू) व शिवाजी पारेकर यांनी कै.भिमराव तुकाराम कोळी (गुरुजी) यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व कोळी गुरुजींनी कठीण प्रसंगामध्ये दोन दोन किलोमीटर वाडीवस्तीवर जावून ज्ञानदानाचे काम केले याची आठवण करुन दिली.आज गुरुजींचा वारसा पुढे घेवून जाण्याचे त्यांची मुले सुरेश,सौ.स्वाती कोळी व आप्पासाहेब हे पुढे चालवित आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे सांगितले.
याप्रसंगी आमच्या गरीबपणामुळे मी तीन वर्ष शाळा सोडली होती.परंतु कै.कोळी गुरुजींनी मला पुन्हा परिक्षेला बसवून एसएससीच्या बोर्डाच्या परिक्षेसाठी जूनी पुस्तके उपलब्ध करुन दिली व मी गुरुजींच्या बरोबर एसएससीची परिक्षा देवून पास झालो. त्यांच्यांच प्रेरणेने पुढे एमपीएससीमार्फत फौजदार परिक्षा पास होवून मुंबई पोलिस दलांमध्ये चांगल्याप्रकारे सेवा देवून आज मी पोलिस उपअधिक्षक पदांवरुन सेवानिवृत्त झालो. याचे सर्व श्रेय मी कै.कोळी गुरुजींना देतो असे गौरवोउदगा्र शिवाजीराव मंडले,माजी मुंबई पोलिस उपअधिक्षक यांनी काढले.
यावेळी उपस्थितामध्ये सर्वजण भारावून गेले.कार्यक्रमाच्या शेवटी रामचंद्र कोळी यांनी सर्वांचे आभार मानले.यापुढील काळामध्ये आमच्या कुटुंबावर पूर्वीप्रमाणेच प्रेमाचा व मायेचा हात कायम ठेवावा अशी विनंती करुन कार्यक्रम संपलेचे जाहीर केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती