कै.यशोदा हुलगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी,आरती व महाप्रसादाचे आयोजन

विनोदाचार्य ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

गोरडवाडी ता.माळशिरस येथे विनोदाचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य किर्तन रविवार दि. २९ मे २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये स्व. यशोदा सुग्रीव हुलगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोरडवाडी येथील निवासस्थानी होणार आहे.
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.तरी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन श्रीमती तानुबाई साहेबराव हुलगे, श्री. सुग्रीव साहेबराव हुलगे, श्री. बिभीशण सुग्रीव हुलगे, श्री. विष्णू सुग्रीव हुलगे, श्री. तात्या साहेबराव हुलगे, श्री. किसन साहेबराव हुलगे आणि पत्रकार संजय हुलगे यांच्या वहिनी तसेच हुलगे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्यास नम्र आवाहन करण्यात आले आहे.