शंभू महादेवाच्या वेळापूर नगरीत सुखरूप, काळजी करण्याचे कारण नाही-राम सातपुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा वेळापूर येथे अपघात झाला.आ. राम सातपुते यांची गाडी सर्विसिंगला दिलेली असल्याने ते मित्राची गाडी घेवून कार्यक्रमासाठी निघाले होते. गाडीमधील कोणालाही खरचटलेसुद्धा नाही. वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत आ.राम सातपुते यांच्यासह विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे, चालक सर्व सहीसलामत आहेत.काही काळजी करण्याचे कारण नाही.
आमदार राम सातपुते मुंबई, पुणे येथील कामे आटोपुन आज सकाळी मतदारसंघातील लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांना भेटी देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या टेंभुर्णी येथील कार्यक्रमासाठी जात असताना पुणे-पंढरपूर रोडवर वेळापूर येथे अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने चालकांनी बाजूला घेत असताना डीवाईडरवर गाडी गेली आणि समोरचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी बाजूच्या शेतामध्ये गेली. सुदैवाने गाडीमधील आमदारासह कोणालाच दुखापत अथवा इजा झालेली नाही.
आमदार यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात वार्यासारखी बातमी पसरली. अनेकांचे फोन एकमेकांना खणाणू लागले. आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क केला असता जनतेच्या सेवेमुळे अपघात होऊनसुद्धा खरचटले नाही. शंभू महादेवाच्या नगरीमध्ये अपघात झालेला आहे. गाडीचे टायर फक्त फुटलेले आहेत, बाकी काही नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, आपला आशिर्वाद कायम पाठीशी असल्याने भविष्यात आपली सेवा कायम करणार असल्याचे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती