माळशिरस तालुका प्रतिनिधी /संजय हुलगे :
ज्येष्ठ नेते स्वर्गीय माजी सरपंच बापूराव सिद यांच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त माळशिरस शहरांमध्ये भव्य रक्तदान शिबिर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनुयायी व परिवारातील सदस्यांनी घेतलेले होते. रक्तदान शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ वाढवून करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे व माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ .विश्वनाथ वडजे उभयतांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख मान्यवर माळशिरस नगरपंचायत चे विद्यमान उपनगराध्यक्ष डॉ मारुतीराव पाटील, माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व व माजी पंचायत समिती सदस्य तुकारामभाऊ देशमुख, निवृत्त वन अधिकारी गंगाधर पिसे, माळशिरस नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक मारुती उर्फ आप्पासाहेब देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे ,सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव सिद, रामचंद्र सिद, माळशिरस नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा लतादेवी सिद, युवा नेते माजी चेअरमन संदीपभैया सिद , डॉ . संजय सिद , डॉ .नितीन सिद आदी मान्यवरांसह सिद परिवारातील सदस्य उपस्थित होते.
बापूराव सिद यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये माळशिरस शहराचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी त्याकाळी केलेले काम आज सुद्धा अजरामर आहे. माळशिरस शहराचा कायापालट केला. माळशिरस परिसरामध्ये नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्व आज 34 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा त्यांच्या स्मृती त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व परिवाराने जपलेल्या आहेत आज कोरोना सारख्या विषारी विषाणूने थैमान घातलेले असताना सर्वसामान्य व गरजू लोकांना रक्तदानाची गरज असल्यामुळे सिद परिवाराने चांगला उपक्रम रक्तदानाचा हाती घेतलेला असल्यामुळे त्यांच्या रक्तदानाबद्दल कौतुक केले जात आहे आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी आपला रक्तदान करण्यासाठी सहभाग नोंदविला आहे पुण्यतिथी निमित्त चांगला उपक्रम हाती घेतलेला असल्याने सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती