माळशिरस तालुका प्रतिनिधी /संजय हुलगे :
राज्यात मेंढपाळांवर सातत्याने अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. मात्र, मेंढपाळांवरील हल्लयाबाबत सरकार गांभीर्याने पाहत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकशाहीला न शोभणारी गोष्ट आहे. वेळीच मेंढपाळांवरील हल्ले खोरांवर कारवाई तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अन्यथा मेंढपाळांचा भव्य मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल,असा इशारा महाराष्ट्र यशवंत सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश होनमाने दिला आहे .राज्यातील मेंढपाळ वणवण भटकतात. ऊन, वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता तसेच आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत. वीज पडून अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अनेक मेंढपाळांनी जीव गमावला आहे. या संकटाच्या काळात माणुसकी दाखवणे गरजेचे आहे.परंतु काही ठिकाणी मेंढपाळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखण्याची गरज आहे. सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना कडक असे शासन केले पाहिजे. समाज कंटकांकडून होणारी अरेरावी, जातीवाचक ,शिवीगाळ, मेंढ्या चोरून नेणे, काही गावात स्थानिक लोकांकडून मेंढपाळ समाज बांधवांना मारहाण, तसेच काही ठिकाणी मेंढपाळांनी आपला जीव गमवला आहे.मेंढपाळांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे अशा हल्ला करणाऱ्या नराधमांवर कडक शासन करा. त्यांच्या कुटुंबांना बंदुकीचा परवाना व संरक्षण द्या,अशी मागणी आकाश होनमाने यांनी केली आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती