बहिणीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा!
धावत्या दुचाकीवरून पोटात केले चाकूने वार!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बीड
बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची धावत्या दुचाकीवरून अंधारात चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील मंझेरी येथील शांतीवन जवळ घडली. या घटनेनंतर दुचाकीवरून पलायन केलेल्या मारेकऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करून बेड्या ठोकल्या. ब्रह्मदेव हनुमान कदम (वय २६, रा.मंझेरी ता.जि.बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर पांडुरंग बहिरवाळ (रा.मंझेरी ता.जि.बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत ब्रह्मदेव कदम हा अविवाहित असून तो शेती करीत होता. त्याचा मित्र आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर याची बहिण नांदत नसून या मित्रांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे असल्याने तिचे व ब्रह्मदेवचे सुत जुळले होते. त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची लक्ष्मणला चाहूल लागली होती.
रात्री पालीनजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करून ब्रह्मदेव आणि लक्ष्मण हे दोघेही मंझेरी गावाकडे जात होते. यावेळी शांतीवन जवळ आल्यानंतर आरोपी लक्ष्मण याने धावत्या दुचाकीवरच ब्रह्मदेव याच्या पोटात चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली व नंतर तो गाडी घेऊन फरार झाला.बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या