प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
मोहोळ
सोलापूर-पंढरपूर महामार्गावर पेनुर गावानजीक झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले असून सहाजण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये डॉक्टर दांपत्य व त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, मोहोळ येथील डॉक्टर पती-पत्नी व नातेवाईक पंढरपूरकडून मोहोळकडे निघाले होते. तर सोलापूर येथून लग्न आटपून कारमधून पंढरपूर येथील गादेगावकडे निघाले होते. पंढरपूर-मोहोळ महामार्गावर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत सहा जण जागीच ठार झाले.यामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नी, मेहुणे व त्यांची पत्नी यांच्यासह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. डॉ.आफरिन अत्तार, डॉ.मुजाहिद अत्तार, मेव्हणे इरफान खान, त्यांची पत्नी यांच्यासह गाडीतील दोन मुलं असे सहाजण जागीच ठार झाले. तर सोलापूरहुन पंढरपूरकडे निघालेल्या कारमधील राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे,मंदाकिनी शेटे यांच्यासह सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या