प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
महूद
चिकमहूद-दिघंची मार्गावरील हॉटेल विशालजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे.अपघातातील मयत तरुण वरकुटे-मलवडी(ता.माण, जि.सातारा)येथील आहे.
आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिकमहूद(ता.सांगोला) ते दिघंची(जि.सांगली)मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.या अपघातात सुशांत शांताराम जाधव (वय २८,रा.वरकुटे-मलवडी ता. माण, जि.सातारा) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्यांच्यासोबत असणारा मंगेश शिवाजी पिसे(वय २८,रा.वरकुटे-मलवडी,ता.माण,जि.सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे.वरकुटे- मलवडी येथील हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकी क्रमांक एम.एच.११,बी.पी. ०८३९ या दुचाकीवरून दिघंची मार्गे महूदकडे जात होते.तर अज्ञात वाहन चिकमहूदहून दिघंचीकडे निघाले होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
यावेळी सागर जावीर,वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तात्काळ १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले.जखमी मंगेश पिसे यास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगोलाकडे पाठविण्यात आले. अज्ञात वाहन या मोटारसायकलस्वारांच्या अंगावरून व डोक्यावरून गेल्याने सर्वत्र मांस व रक्ताचा सडा पडलेला होता.
ब्लॅक स्पॉट व वारंवार अपघात
पंढरपूर-मल्हारपेठ मार्गावरील चिकमहूद(ता. सांगोला) शिवारात येथे वळणावळणाचा धोकादायक रस्ता आहे. येथे यापूर्वीही अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे.हा ब्लॅक स्पाॅट दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या