प्रा.डॉ.धनंजय लोहार यांना पितृशोक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नाथा आनंदा लोहार (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने आटपाडी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. धनंजय लोहार यांचे ते वडील होतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झरे येथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले.विभूतवाडी भागात समाजकार्य, राजकारण, शिक्षण क्षेत्रात सक्रिय सहभाग होता. त्यांचे आटपाडी येथील विद्यानगर येथे राहत होते. काल रात्री साडे अकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेसहा वाजता विभुतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.