अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एसआरव्हीएम) हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव ताड (सर) ( वय-७५) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
जतच्या राजकिय पटलावर आक्रमक नेतृत्व म्हणून शिवाजीराव ताड यांना ओळखले जायचे. जतला शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम त्यांनी काम केले.त्यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
जतचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक विजय ताड यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , तीन मुली ,जावई, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती