अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
गोर सेना या राष्ट्रीय बंजारा सामाजिक संस्थेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा भीमराव राठोड यांची तर जत तालुका अध्यक्षपदी विजय बाबुराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सहसचिव शंकर चव्हाण यांनी दोघांना निवडीचे पत्र देऊन केले आहेत.
निगडी बुद्रूक येथे झालेल्या गोर सेना बंजारा संघटनेच्या व समाजाच्या झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. या दोघांचाही सत्कार करण्यात आला. या बैठकीत उमदी येथील मर्चंडी तांडा, निगडीबुद्रूक व अंकलगी तांडा येथील समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन इंजि. सखाराम राठोड यांनी केले.
यावेळी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रोहित राठोड, ड्रायव्हर युनियन जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, निगडी बुद्रुक शाखाध्यक्ष संजय राठोड, उपाध्यक्ष सुनिल पवार, सचिव विक्रम राठोड, उटगी शाखा अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष सुनील नाईक, सचिव सागर राठोड, उमदी मर्चंड तांडा शाखाध्यक्ष अक्षय पवार, उपाध्यक्ष नितीन पवार, सचिव सुनील पवार यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी पोलीस पाटील विनोद पवार, मोतीलाल पवार, प्रकाश पवार, मनोज पवार, सुरेश राठोड,निखिल जाधव, पांडुरंग राठोड व करण राठोड आदि उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती