पांढरेवाडी(दिघंची) येथे हनुमान जयंती साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
पांढरेवाडी (दिघंची) येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जय हनुमान गणेश तरुण मंडळाने पुढाकार घेऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली.
नळमळा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.कार्यक्रमानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यासाठी नितीन काटे, पंकज बुरुंगे, विशाल भुशारी, अक्षय पवार, साहिल भूशारी, मिलीन बनसोडे यांनी पुढाकार घेतला.