माडगुळे येथे हनुमान जयंती साजरी

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माडगुळे:

माडगुळे येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री हनुमान! श्रेष्ठ वानर देव! रामायणातील एक अतिशय महत्वाचे पात्र! तत्वज्ञानी, महानायक म्हणून खरा उतरणारा असा हनुमान, प्रभू रामाचा एक विश्वासू अनुयायी, सच्चा भक्त! लंकानगरीला आपल्या शेपटीने ज्वालांमध्ये लढणारा योद्धा! रामाचा दूत बनून सीतामातेला त्यांच्या राम रावणावरच्या विजयाबद्दल खबर देणारा नम्र दूत, संजीवनी साठी द्रोनागिरी पर्वत मुळासकट उचलणारा आणि लक्ष्मणाचा जीव वाचवणारा सच्चा सहयोद्धा! असा हा राम भक्त हनुमान यांची जयंती आज माडगूळे येथील हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुर्योदयाबरोबर हनुमंताच्या मूर्तीवर फुलाचा वर्षाव करून साजरी करण्यात आली. या यावेळी गावातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.