प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
हिवतड गावचे सुपुत्र सतिश विलास डिगोळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक अभियंता गट ब जलसंपदा विभाग पदी निवड झाली आहे. त्याबद्दल कै.जयसिंगराव देशमुख वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाचनालयाचे अध्यक्ष व हिवतड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन धर्मराज जयसिंग देशमुख, सेवानिवृत्त डीवायएसपी शिवाजीराव मंडले, भाजपा तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, उपसरपंच वसंतराव माळी, हिवतड विकास सोसायटीचे नूतन संचालक संतोष रामचंद्र देशमुख, नारायण धुरूपे, दत्तात्रय काटकर, मारुती डोंबाळे, शिवाजी माळी, दिनेश डिगोळे, मिलिंद पवार, दिपक काटकर, शंभूराजे डिगोळे,नानासाहेब शाहीर आदी मान्यवर उपस्थित होते.
विकास सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख व निवृत्त डीवायएसपी शिवाजीराव मंडले यांनी युवकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद