प्रभाग क्र.एकमध्ये निधी कमी पडू देणार नाही: आ. विक्रमसिंह सावंत

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

जत शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बेळुंखी ऑइलमिल ते राजू शिंदे घर काँक्रीटीकरण रस्ते कामासाठी 13 लाख, 62 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या कामाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सांवत म्हणाले की, प्रभाग एक साठी आणखी निधी देऊ व प्रभागातील उर्वरित कामे लवकरच पूर्ण करु व प्रभाग क्रमांक एकसाठी निधी कमी पडू देणार नाही.
यावेळी जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, गटनेते साहेबराव कोळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, अरुण साळे, कुमार साळे, विकास बनपट्टे, सिद्धू जाधव,संदीप जाधव,मानसिंग कांबळे, पांडुरंग सूर्यवंशी, किसन व्हनखडे, दत्तात्रय शिंदे,सिद्राम मोरे ,धीरज मोरे, अर्जुन मोरे, अजय भिसे, केशव शिंदे,विनोद माने आदि उपस्थित होते.
माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.