
देशमुख महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस विभागाचा अनोखा उपक्रम
अमित पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वच्छता अभियान राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयातील या दोन्ही विभागाच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी असे नवनवीन उपक्रम राबविले जातात. यातूनच आटपाडी न्यायालयाच्या परिसरामध्ये संस्थेचे चेअरमन अमरसिंह बापू देशमुख यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.विजय शिंदे, प्रा.सदाशिव मोरे, प्रा.गणपतराव नांगरे, डाॅ.धनंजय लोहार, डाॅ.किशोर जाधव व प्रा.हणमंत सावंत यांनी तीन दिवस स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये जवळपास शंभर एनएसएस स्वयंसेवक व पन्नास एनसीसी कॅडेटस सहभागी झाले होते. आटपाडी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील, सहदिवाणी न्यायाधीश अनंत टेंगसे तसेच ॲड.महेश पाटील व इतर स्टाफ यांनी सहभाग घेवून मोलाचे सहकार्य केले.
यावेळी न्यायालयाच्या परिसरातील गवत काढून,चिल्लार तोडून, स्वच्छता करून झाडांना आळी करण्यात आली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने आटपाडी न्यायालयाचा आतील सर्व परिसर स्वच्छतेसाठी वर्षभर दत्तक म्हणून घेण्यात आला आहे. पुढील वर्षभरामध्ये या परिसरात स्वच्छता अभियान, झाडांना आळी करणे, नवीन वृक्षारोपण करणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय लोंढे, प्रा.सदाशिव मोरे, प्रा.विजय शिंदे यांनी न्यायाधीश यांना दिली. यावेळी न्यायाधीशांनीही पूर्ण सहकार्य करु असे आश्वासन दिले.
स्वच्छता अभियानाचे नेतृत्व संजय जगताप, समाधान बाड, स्वाती शिंदे,अभिषेक बालटे,नियाज नदाफ,चैतन्य साळुंखे,रविराज पाटील व पवन केंगार या विद्यार्थ्यांनी केले.



संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद