अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
आपल्याला सुख आणि परमानंदाची प्राप्ती करूण घ्यायची असेल तर भक्ती केली पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प.श्री.रविंद्र महाराज पिंपळगावकर यांनी केले आहे.
श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय किर्तन महोत्सव कार्यक्रमात प्रबोधन करीत होते.
जत येथील श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, शहाजीबापू भोसले, सदाशिव (दादा) जाधव आदी पदाधिकारी यामध्ये सहभाग घेऊन हे सर्व कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडतात.
श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त पहाटे श्री. स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या किर्तन महोत्सव कार्यक्रमात प्रबोधन करताना ह.भ.प.रविंद्र महाराज पिपळगावकर म्हणाले की, प्रत्येकाने भक्ती केली पाहीजे, जसी आपली भक्ती त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळते. माणूस शेवटच्या क्षणी आपल्याबरोबर जाताना धन,संपत्ती, जमिन, काहीही न नेता सर्व काही पाठीमागे ठेवून जातो. तो आपल्याबरोबर फक्त आयुष्यात जे सत्कर्म केले आहे, तेच बरोबर घेऊन जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपणाला मिळालेल्या संपत्तीतून थोडेतरी दान केले पाहिजे.
जो माणूस जसे कर्म करीत जातो,त्याप्रमाणे त्याच्या पदरात फळ मिळते. चांगले कर्म करणा-यास चांगले फळ मिळते तर वाईट कर्म करणा-याला वाईट फळ मिळते.
प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची व परमेश्वराची सेवा केली तर त्याला जीवनात सुख, शांती व समाधान मिळून आत्मानंदाची व परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
यावेळी मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जतचे चेअरमन गणेश सावंत, नगरसेवक स्वप्निल शिंदे, अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजीबापू भोसले, श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचे माजी प्राचार्य वसंतराव बोराडे, शिवसेना नेते दिनकर पतंगे, महादेव पवार, सागर व्हसमाळे, अतुल मोरे, वसंत उगळे, गोटू जाधव, शंकर वाघमोडे, सुहास व्हसमाळे, सौ.शालन पवार, दिनराज वाघमारे,बापू पोरे,पिंटू मोरे,सागर व्हसमाळे, नारायण पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी श्री. स्वामी समर्थ महाराज चरणी फुले वाहण्यात आली.
त्यानंतर उपस्थित सर्वांना ट्रस्टचेवतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती