माळशिरस प्रतिनिधी/ संजय हुलगे :
आविष्कार सोशल ॲन्ड एज्युकेशनल फाऊंडेशन, कोल्हापूर ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि करीत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात.श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माळशिरस या विद्यालयातील प्राचार्य योगेश गुजरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या व करीत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेऊन राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लोकराजा शाहू गौरव पुरस्कार २०२० देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, अभ्यासपूरक साहित्य गोळा करणे, शाळेची आवड लागावी, संस्कार मन घडावीत यासाठी प्रेरित करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, विद्यालयाची गुणवत्ता टिकवणे, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडविणे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आपल्या विद्यालयातील प्राचार्यांचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कारामुळे संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, संचालक गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, महेश बोत्रे, आदीनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती