
आटपाडी दि.१०( प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या सर्व प्रश्नांसंबंधी विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाच्या सत्कारास उत्तर देताना विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले.
प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या वेतनासाठी सी.एम.पी. प्रणालीचा अवलंब करणे, राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करणे ,विषय शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने रुपये 4300 ग्रेड वेतन सुरू करणे ,केंद्रप्रमुख यांची पदे अभावितपणे भरणे, शिक्षकांच्या बदल्याबाबत खो-खो पद्धत बंद करणे. याशिवाय अन्य मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना देण्यात आले . यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान आमदार साहेबांनी केला.
यावेळी जि.प.माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, कार्याध्यक्ष सतीश पाटील, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन सुनीलराव गुरव, माजी चेअरमन यु.टी .जाधव, बाळासाहेब आडके ,आटपाडी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, खानापूर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय शिंदे ,माजी अध्यक्ष राजाराम शिंदे, शिक्षक नेते सिद्धार्थ कटरे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजीराव देठे, भीमराव सावंत ,फुले ,शाहू आंबेडकर सहकारी रुग्णालय संचालक बाबासाहेब शेख दीपकराव कुंभार, के .एम. पाटील सर ,सयाजी बंडगर, संजय कबीर, हैबतराव पावणे, भास्करराव डिगोळे,भरत कदम,विजयराव पवार, सचिन सासणे आदी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती