संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
मोटेवाडी(मा) येथील ग्रामसचिवालय कार्यालय व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गाव प्लस्टिकमुक्त करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी बॅगा तयार करणे प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.४५ युवती व महिलांनी या शिबीरामध्ये सहभाग घेतला होता.
टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून कापडी कपड्यांपासून समोसा बॅग, पेनपाऊच, मेकअप बॉक्स, वन साईड पर्स, फॅन्सी बॅग, प्रवासी बॅग, अँपल पर्स, चार कप्पी पर्स, स्कूल बॅग बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या युवती व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.द्वारका राऊत, ग्रामविकास अधिकारी पी.एम.एकतपुरे, प्रकल्प अधिकारी संजय देसाई, प्रशिक्षक प्रकाश पाटील, तालुका प्रतिनिधी अनिल वायदंडे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह भोसले व भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष प्रा.दादासाहेब खरात यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन कोमल ठेंगल यांनी केले व शितल कोळेकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद