
संजय हुलगे /माळशिरस तालुका प्रतिनिधीे :
माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख व श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरसचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी कोरोना लॉकडाऊन कालावधीत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेऊन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वॉरीअर्सना आविष्कार सोशल आणि एज्युकेशनल फॉऊंडेशन, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हास्तर कोविड-१९ समाजरक्षक विशेष २०२० सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस शहरात कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून अनेक भागात कोरोना प्राथमिक तपासणी शिबीर मोहीम राबवली. शहराच्या अनेक भागात अन्नधान्य वाटप केले. रक्तदान शिबीर व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.प्रसार माध्यमातून जनजागृती करणे, तसेच श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून अनेक नेत्रदीपक प्रगती केली.आपल्या संस्थेने शिक्षण क्षेत्रातही क्रांती करत अनेक पदके, पारितोषिके मिळवली.आप्पासाहेब देशमुख यांनी शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक क्षेत्रातही कार्याचा ठसा उमटवला या कार्याची नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती.तसेच आपले विद्यालय विनाअनुदान तत्वावर असूनही कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीमुळे आपल्या विद्यालयात सर्व नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पाठ्यपुस्तके वाटप हा उपक्रम राबविला जात आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरसचे संस्थाध्यक्ष व प्राचार्याना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती