समाजसेवक संभाजीशेठ पाटील यांच्याकडून आटपाडी ग्रामपंचायत व पोलिस ठाण्याला ऑटो सॅनिटायझर मशीन भेट!

आटपाडी/प्रतिनिधी:
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संभाजीशेठ पाटील यांनी आटपाडी पोलिस ठाणे व ग्रामपंचायतीसाठी ऑटो सॅनिटायझर मशीन भेट दिले.
समाजसेवक संभाजीशेठ पाटील यांनी विविध ठिकाणी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या माध्यमातून जिल्हा सचिव गणेश रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून व सुरक्षिततेचा उपाय म्हणून या गजबजलेल्या ठिकाणी हे मशीन दिले आहे.

पोलीस ठाणेमधील सर्व पोलीस तसेच ग्रामपंचायतीमधील सर्व पदाधिकारी, कर्मचारी,नागरिक व कामानिमित्त येणारे अन्य लोक यांच्यासाठी हात न लावता सॅनिटाइजर हातावर सोडणारे हे मशीन आहे.
अतिशय उत्तम व समाज उपयोगी कार्य केल्याबद्दल दोन्ही विभागांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.