सरपंचाची बनावट सही करून कामांचे प्रस्ताव दाखल!

दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी
कक्ष अधिकार्‍यामुळे प्रकार झाला उघड!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस :

जळभावी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचाची बनावट सही करून विकासकामांचे प्रस्ताव दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामसेवक पी.बी. काळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
जळभावी (ता. माळशिरस) या ग्रामपंचायतीचे सरपंच किसन रामा राऊत यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन 2021 – 22 असे विकासकामे करण्याचे प्रस्ताव माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बुगड यांच्याकडे घेऊन गेले. बुगड यांच्याकडे दलितवस्ती काम पाहण्याचे कामकाज आहे. त्यावेळी जळभावीचे किती प्रस्ताव देता? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच यांना प्रश्न पडला. अद्याप कोणत्याच प्रस्तावावर मी सही केली नाही, मग पंचायत समितीत खोटी सही करून प्रस्ताव दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी प्रस्तावावरील सही पाहिल्यानंतर ती सही बनावट असल्याने त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दिलेली आहे. खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामसेवक पी.बी. काळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगून माळशिरस पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बुगड यांच्यामुळे बनावट सही उघड झाली आहे. आणखी असे किती गैरप्रकार झालेले आहेत हे पहावे लागणार असल्याचे सांगितले.
जळभावी गावचे सरपंच यांनी पंचायत समितीकडून बनावट सही केलेल्या कागदपत्राची पाहणी केल्यानंतर या दोन्ही प्रस्तावावर ग्रामसेवक पी.बी .काळे यांची सही आहे. यावरून ग्रामसेवक यांना बनावट सही करणारी व्यक्ती व त्यांना सहकार्य करणारे याची सर्व माहिती असणार आहे. सरपंचांनी सही केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रावर ग्रामसेवक सही करत असतात. ग्रामपंचायतीमध्ये सभा झाल्यानंतर प्रोसिडिंगवर सरपंचांची सही नाही. तोपर्यंतच ग्रामसेवक व सरपंचाची बनावट सही करून प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल कसे झाले? असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रस्तावावर पंचशील नगर येथे 2007-08 पाणीपुरवठा योजना : 2.5 लाख व रस्ता डांबरीकरण: 2.53 लाख, सन 2018 -19 काँक्रीट रस्ता: 3.00 लाख, सन 2021- 22 हायमास्ट दिवा: 1.35 लाख, दुसरा प्रस्ताव होलार समाज वस्ती या ठिकाणी सन 2015 – 16 रस्ता डांबरीकरण: 2,00,000 , हायमास्ट दिवा 2,00.,000 ,सन 2019 – 20 पाणीपुरवठा टाकी करणे: 2,00,000, सन 2021- 22 पेविंग ब्लॉक करणे: 3,00,000 ,हायमास्ट दिवा 1,35,000 अशी विकास कामे पूर्ण झालेली आहेत. या प्रस्तावावर सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. हमीपत्रावर सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सरपंचांची सही मात्र बनावट आहे.होलार समाज वस्तीच्या प्रस्तावावर सूचक आबासाहेेब सुळ तर अनुमोदक आशाबाई राऊत यांची नावे आहेत. या ठरावावर सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे काम मंजूर करण्यासाठी शिफारस सरपंच ,ग्रामसेवक, शाखा अभियंता, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काम पूर्ण झालेल्या ठिकाणचा पंचनामा केल्यानंतर सदर पंचनाम्यावर सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता, विस्ताराधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. स्थळदर्शक नकाशावर सरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी, उप अभियंता यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या सर्वामधील सरपंचांची सही ही बनावट असल्याचे सांगितले.
पंचशील नगर व होलार समाज वस्ती प्रस्तावाची छाननी केली असता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार प्रस्ताव पात्र आहे व त्याची मंजुरी प्रस्ताव शिफारस करीत आहे, अशी शिफारस गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती यांची स्वाक्षरी आहे.
ही माहिती ग्रामपंचायतीकडील दप्तरावरुन व प्रत्यक्ष पहिल्यावरून देण्यात आलेली असून सदरची माहिती खोटी आढळल्यास संपूर्ण अनुदान व्याजासह वसूल होईल याची आम्हाला जाणीव आहे असे प्रस्तावावर सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यातील सरपंचाची सही.ही बनावट आहे
हे प्रस्ताव सरपंच यांच्या स्वाक्षरीने गेलेले नाहीत.या प्रस्तावावर ग्रामसेवक यांची व पंचायत समितीच्या शाखाधिकारी, उप अभियंता, विस्ताराधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सदरची कामे पूर्ण असा शेरा आहे. सध्यातरी किसन रामा राऊत यांची स्वाक्षरी नसल्याने सदरची कामे खरी केलेली आहेत का ? नाही हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कागदोपत्री तरी पूर्ण असा शेरा आहे.लवकरच सर्व प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा जळभावी ग्रामपंचायतीचे सरपंच किसना रामा राऊत यांनी दिलेला आहे.