गोरडवाडी येथील बाळूमामा मंदिरात उद्या धार्मिक कार्यक्रम

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस :

गोरडवाडी येथील बाळूमामा मंदिर येथे रविवारी दि .६ फेब्रुवारी रोजी हिमालयातील साधू यांचा दर्शनाचा योग येणार आहे.तसेच सद्गुरू बाळुमामा भक्तांना भंडारा-स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.सदगुरु बाळुमामाचे भक्त,सेवेकरी, साधक, वारकरी संप्रदायाचे भावीक व समस्थ ग्रामस्थ मित्र, भक्तांना दिवसभर स्नेहभोजन तसेच संध्याकाळी चक्री भजन होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक दत्तात्रय गोरड व पत्रकार संजय हुलगे यांनी केले आहे.