
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस :
माळशिरस येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ७ दिवसीय राजयोग शिबीर संपन्न झाले.
या शिबिराचे आयोजन राजयोगिनी ब्रम्हकुमारी शिवरात्री बहनजी ,संचालिका, अकलुज सेंटर .राजयोगिनी ब्रम्हकुमारी जयश्री बहनजी, संचालिका माळशिरस सेंटर यांच्याद्वारे करण्यात आले. राजयोगाचा आध्यात्मिक अर्थ आहे. आत्म्याचा परमात्म्याशी जोड ,संबंध ,मिलन .आत्मा व परमात्मा यांचे मिलन सर्वश्रेष्ठ असल्याने याला राजयोग म्हणतात. राजयोग हा सर्व योगाचा राजा आहे. स्वतः परमात्माच आपला परिचय देऊन आत्म्याला आपल्याशी योग्य युक्त होण्याचा विधी सांगतो. या योगाचा शिक्षक सर्वश्रेष्ठ योगेश्वर प्रत्यक्ष परमात्माच असल्याने याला राजयोग असेही म्हणण्यात येते .या योगाद्वारे आपले संस्कार उच्च व श्रेष्ठ बनतात. जीवनात कर्मात श्रेष्ठता आणून आपल्याला कर्मेंद्रियाचा राजा बनवितो .आत्म्याला परमात्म्याचे खरे स्वरूप, स्वभाव, धाम, गुण व कर्तव्य याचे ज्ञान होईल, तेव्हाच राजयोगाचा अभ्यास करणे शक्य होईल. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की या राजयोगाद्वारे अनेक आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे मिळतात.
आयोजक शिवकमल योग निसर्गोपचार व्यसनमुक्ती केंद्र व मालशिरस राजयोगी परीवार , वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे , नागेश वाघमोडे ,जानकर , जयसिंग खांडेकर , वैभव शिंगाडे ,डाँ बाळासाहेब चंदनशिवे, सुवर्णा कुलकर्णी , पत्रकार एल डी वाघमोडे ,बंडू पावले, विठ्ठल पालवे, शिंदे,अँड. मारूती वाघमोडे व मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती