
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी :
आटपाडीतील साहसी महिलांनी सह्यगिरी ट्रेकर्स सांगली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर यशस्वीरित्या सर केले.
शिखरावर जाताना अतिशय अवघड व दुर्गम असणारी वाट आपल्या पायाखाली तुडवत या रणरागिनींनी मोहिमेत हिरिरीने सहभाग घेऊन जिल्ह्यातून एकूण ५० महिलांनी भाग घेतला होता . त्यात आटपाडीतून तेजस्विनी गायकवाड ,वैशाली राक्षे, मनिषा चव्हाण, अनिता कदम, अनिता पाटील ,मंगल गुरव, आशा माळी, दिपाली देवकर, विजयश्री वाघमारे, दिपाली स्वामी ,भावना विभूते ,मंगल विभूते ,वनिता देशमुख ,अंजली नामदास ,डॉ.प्रतिक्षा नामदास, लक्ष्मी जाधव ,नीता सुर्वे, मनिषा मोरे, वैशाली माने या महिलांनी भाग घेतला होता व यशस्वीरित्या १६४६ मीटर उंचीचे हे शिखर सर केले.
या ट्रेकमध्ये त्यांना सह्यगिरी ट्रेकर्स सांगलीचे वैभव बंडगर, अजित पाटील, युवराज साठे, दिलीप गोसावी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सर्व महिलांच्या या धाडसी कर्तृत्वाने ‘हम भी कुछ कम नही’ याप्रमाणे कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याने सर्वांकडून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती