श्री शंकर सहकारीच्या २ लाख १ व्या साखर पोत्यांचे पूजन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

श्री.शंकर सहकारी साखर कारखाना लि.सदाशिवनगर च्या २ लाख १ व्या साखरेच्या पोत्याचे पूजन विधानपरिषद आमदार तथा चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रताप पाटील, शंकर सहकारीचे व्हा. चेअरमन ॲड मिलिंद कुलकर्णी, सोमनाथ भोसले, संचालक रामदास कर्णे, सुनील माने, सुरेश मोहिते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, जि.प. सदस्य गणेश पाटील, सरपंच देविदास ढोपे, सरपंच शिवाजी जाधव, सरपंच नितीन मोहिते ( माळी ), उपसरपंच संजय आर्वे, उपसरपंच शिवराज निंबाळकर, अनंतलाल दोशी, तुकाराम चव्हाण, एकनाथ वाघमोडे, दादा पाटील, नवनाथ पिसे, विरकुमार दोशी, तसेच शंकर सहकारी चे अधिकारी व पदाधिकारी कर्मचारी, कामगार व सभासद शेतकरी उपस्थित होते.