अपघाताने मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाने किंवा नातेवाईकाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा- दिनकर पतंगे
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :
अपघाताने मयत झालेल्या शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती अपघाताने मयत झाल्यास त्याच्या नातेवाईकाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने सुरू झालेल्या शासकीय योजनेचा फायदा घ्यावा,असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्य प्रवक्ते दिनकर पतंगे यांनी केले. ते आज वज्रवाड ता.जत येथे जाऊन मयत झालेला सोळा वर्षाचा मुलगा राहुल नानासो चिंतामणी यांच्या नातेवाईकांना भेटून चर्चा केली. त्या कुटुंबाला धीर दिला. कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.तसेच अपघात विमा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मृत्यूचा दाखला,स्थळ मृत्यूचा दाखला, पोलीस स्टेशनचा रिपोर्ट, बँक पासबुक झेरॉक्स ,आधार कार्ड, पंचनामा, सातबाराचा उतारा,फोटो, अर्जदाराचे नाव शक्यतो महिला असावी अशा प्रकारचे लागणारे कागदपत्राची माहिती दिली. काही कागदपत्रांची पूर्तता पण केली. ऑनलाईन अर्ज भरणेबाबत महत्वाची सूचना दिली. शेतकरी कुटुंबातील इतर व्यक्तीही दहा वर्ष ते 75 वर्षाची असावी. मात्र त्यांचे वडील किंवा आई यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते चौगुले, ज्येष्ठ नेते तुकाराम माळी,रमेश माळी,रवि सोलंकर व गावातील व त्यांच्या कुटुंबातील इतर नातेवाईक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेकडून जेवढे शक्य आहे, तेवढा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.अशा दुःखद प्रसंगी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे.महाराष्ट्र कामगार सेना नेहमीच दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या वेळी संकटास मदत करीत आहे.या पुढे मदत करत राहील, असे मत दिनकर पतंगे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती