जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेत जागर फाउंडेशनतर्फे मास्क वाटप

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत येथील ग्रामदेवता यल्लमा देवी यात्रेत गरजू भाविकांना जागर फाउंडेशनच्या वतीने मोफत मास्क वाटप करण्यात आले.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील भाविकांना निर्बंध लावण्यात आले होते. नवसाला पावणारी देवी म्हणून यल्लमादेवीचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील अनेक भाविकांना मास्कचे वाटप करताना जागर फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी यात्रेचा शेवटचा दिवस होता.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावेळी निर्बंध लावण्यात आले होते. काही भाविक देवीच्या दर्शनासाठी विना मास्क येत होते. अशा भाविकांना ही गरज लक्षात घेऊन जागर फाउंडेशनच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.
जत शहरासह तालुक्यात जागर फाउंडेशन नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे, नगरसेवक राजू यादव,युवा नेते योगेश बाबा मोटे , पांडुरंग सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर जाधव, सुनील शिंदे, विजय मोरे यांनी येणाऱ्या भाविकांना मास्क वाटप केले.