…अखेर ‘तो’ जीवघेणा खड्डा बुजवला!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत-सांगली मार्गावरील शिवाजी पेठ येथे सतत वर्दळीच्या रस्त्यावर जत नगरपालिकेने पाईपलाईन दुरुस्तीसाठी काढलेला खड्डा अद्याप झाकला नव्हता. हा खड्डा अपघातास निमंत्रण ठरत होता. या खड्याकडे जत नगरपरिषद डोळेझाक करत असल्याचे दिसून येत होते.
याबाबत ‘प्रगल्भनायक’ ने यावर प्रकाशझोत टाकून ‘कुणाचा तरी जीव गेल्यावरच पालिका भानावर येणार का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन जत नगरपरिषदेने तातडीने हा खड्डा बुजवला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती