जत येथील खड्डा अपघातास आमंत्रण
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत-सांगली मार्गावरील शिवाजी पेठ येथे सतत वर्दळीच्या रस्त्यावर जत नगरपालिकेने पाईपलाईन दुरुस्तीसाठी काढलेला खड्डा अद्याप झाकला नसल्याने हा खड्डा अपघातास निमंत्रण देत आहे. या खड्याकडे जत नगरपरिषद डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.
एक महिन्यापूर्वी हा खड्डा काढला आहे. या खड्ड्यातील पाईपलाईन दुरुस्तीसुद्धा झाली आहे. हा खड्डा झाकण्यासाठी जत नगरपालिकेस चांगला मुहूर्त सापडत नाही का? या खड्ड्यात चार-चौघांचा बळी गेल्यानंतरच जतची नगरपालिका डोळे उघडणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या सतत वर्दळीच्या रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक महिन्यापूर्वी खड्डा काढला आहे, याचे भान नगरपालिकेस आहे की नाही? मुळात हा रस्ता अरुंद आहे. त्यात भरीसभर म्हणून नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे दर्शन होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती