नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:
माडगुळे येथील खंडोबा पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत बबनराव पवार यांची पुन्हा चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली.
बबनराव पवार हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाले होते.त्यांची काम करण्याची पद्धत, विचार व सर्वसामान्य तळागळातील शेतकऱ्याला आपल्याबरोबर घेऊन चालण्याची पद्धत हे विचारात घेऊन सर्व सभासदांनी त्यांना पुन्हा काम करण्याची संधी देऊन चेअरमन पदाची माला त्यांच्या गळ्यात घातली.
बबनराव पवार यांचा आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते, माडगुळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्धव विभुते, आटपाडी तालुका देखरेख संघाचे माजी चेअरमन मोहनराव विभुते, माडगुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय विभुते, बापूसाहेब विभुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बबनराव पवार म्हणाले, आपण मला फार मोठ्या मनाने पुन्हा काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करू व सर्वसामान्य शेतकऱ्याला सोबत घेऊन मागील पंचवार्षिकपेक्षा जास्त चांगल्याप्रकारे काम करेन.आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास मी बांधील राहून त्यास तडा जाऊ न देता प्रामाणिक असे काम करेल.
सूचक संजय विभुते व अनुमोदक हरिदास विभूते होते.
१)मोहन सीताराम विभुते
२)उद्धव गंगाराम विभुते
३)बापूसाहेब आत्माराम विभुते
४)दिलीप तुकाराम विभुते
५) बाळासो रामचंद्र चौगुले
६)इंदुबाई बाबुराव विभुते
७)उषाताई भाऊसो विभुते
८)चिंगुबाई सीताराम लिंगडे
यांच्या सदस्य म्हणून निवडी करण्यात आल्या.
यावेळी संस्थेतील विकास विभुते, अरुण विभुते, भाऊसो (श्रीकृष्ण) कुलकर्णी, दिलीप विभुते, संजय विभुते, बापुसो विभुते व इतर सभासद हजर होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती