वीज तोडणी थांबवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार : बाळासाहेब सरगर
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
गेल्या अनेक दिवसांंपासून शेतकरी अनेक अस्मानी-सुल्तानी संकटाला तोंड देत असतानाच महावसुली आघाडी सरकारने वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत अगोदरच गारपीट, महापुर, अवकाळी पाऊस अशा अनेक संकटांना तोंड देत असताना या सरकारने शेतकर्यांची वीज तोडणी करण्याचा फतवा काढल्याने शेतकरी बेचैन झाला आहे. भाजपा सरकार सत्तेवर असताना मोफत वीज देण्याची घोषणा करणारे अजित पवार आज मात्र मूक गिळुन गप्प का आहेत ? असा सवाल भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यानी केला आहे .
सध्या शेतकऱ्यांच्या समोर अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीतून व पीकविमामधून सोलापूर जिल्ह्य़ाला वगळले आहे. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वीजपुरवठ्याची आवश्यकता असताना हे सरकार विज कनेक्शन तोडण्यासाठी आदेश काढत आहे. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार असे समीकरण झाले आहे. तात्काळ वीज तोडणी थांबवली नाही तर जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख,युवा मोर्चाचे अध्यक्ष दादासाहेब खरात, सरचिटणीस युवराज वाघमोडे, माळशिरस शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, शहर उपाध्यक्ष राजेंद्र वळकुंदे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती