आटपाडी येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाची उत्साहात सांगता!

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी येथील पंचायत समिती सभागृहात आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली वेदिका उमेशकुमार पाटील (इयत्ता चौथी,जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आटपाडी) ची विद्यार्थिनी तसेच द्वितीय क्रमांक विजेता रुद्र सुनील वाघमारे (इयत्ता तिसरी, प्रकाशवाडी शाळा नंबर २ आटपाडी) चा विद्यार्थी आणि तृतीय क्रमांक विजेता श्रीदत्त विजय ताटपुजे (इयत्ता दुसरी,जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आटपाडी) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती ऋतुजा राजेंद्र कांबळे (इयत्ता चौथी), द्वितीय क्रमांक विजेती ओवी प्रतापसिंह बाबर (इयत्ता तिसरी) आणि तृतीय क्रमांक विजेती श्रेया महेश चांडवले (इयत्ता तिसरी),उत्तेजनार्थ बक्षीस विजेते निहाल सुरज मुल्ला (इयत्ता दुसरी), इंद्रजीत गणेश माजलकर, वैभवी दत्तात्रय चांडवले यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच पथनाट्यामध्ये सहभागी विधीज्ञ ॲड.लतिका माळी, ॲड.ज्ञानेश्वर गळवे, ॲड.अंकिता जानकर,ॲड.सुशांत चंदनशिवे, ॲड.पुष्पांजली काळेबाग,ॲड. महेश पाटील यांचा कायद्याची पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पथनाट्याचे लेखक दिग्दर्शक व सहभागी कलाकार न्यायालयीन कर्मचारी अधिकराव घाडगे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.तसेच याप्रसंगी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. चेतन जाधव यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला.
दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मा.विनायक पाटील यांनी न्याय आपणा सर्वांसाठी असून विधी सेवा समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आणि सुविधांचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले. तसेच वकील संघटनेचे अध्यक्ष चेतन जाधव,आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज भोसले यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाकरिता आटपाडी वकील संघटनेचे अध्यक्ष सी. व्ही.जाधव, उपाध्यक्ष ॲड.व्ही.पी.देशमुख, सचिव ॲड.एस.जी कुलकर्णी, ॲड.आर. आर. इनामदार, ॲड.जे.एम. महामुनी, ॲड.पी.जी. शिंदे, ॲड.ए.एम.आत्तार, ॲड.व्ही.बी.सावंत, सहाय्यक गट विकास अधिकारी एस.एम.भोसले आदी मान्यवर तसेच इतर शिक्षक स्टाफ आणि महिला वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयीन कर्मचारी अधिकराव घाडगे यांनी केले. प्रास्ताविक ॲड.व्ही. पी.देशमुख यांनी केले. स्वागत विस्तार अधिकारी एस.एम.बाड यांनी केले.आभार प्रदर्शन सह दिवाणी न्यायाधीश मा.आनंत टेंगसे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन महेश गावंदरे यांनी केले.