अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत शहरातील नामांकित सराफ व्यावसाईकाकडून लकी ड्रॉ योजनेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक झाली आहे.
दिवाळीनिमित्त जत शहरातील नामांकित सराफ व्यावसाईक यांंनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लकी ड्रॉ योजना काढली. या लकी ड्रॉ योजनेमध्ये मोठमोठी आकर्षक बक्षिसेही जाहीर केली आहेत. जत शहरासह तालुक्यातील गावोगावी या सराफ व्यावसाईकांनी लकी ड्रॉ चे मोठमोठे प्लेक्स लावून या प्लेक्सवर आकर्षक अशा बक्षिसांची मोठी जाहीरातबाजी केली आहे.या जाहीरातबाजीमुळे तालुक्यातील ग्राहक सोने,चांदी खरेदी करण्यासाठी या सराफ पेढ्यांमध्ये मोठी गर्दी करत आहेत.
जो ग्राहक दहा हजार रूपये किंमतीचे सोने व पाच हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने खरेदी करतो, अशा ग्राहकांना या सराफपेढीमधून बक्षिसाचे कुपन दिले जाईल,अशी जाहीरातबाजी केली.बक्षिसाच्या अपेक्षेने ग्राहकांंनी सोने खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्यांंची मोठी फसवणूक होताना दिसत आहे.
ग्राहकांनी सोने व चांदी खरेदी केल्यानंतर जी.एस.टी.आकारून पावती तयार केल्यानंतर ग्राहकांना सोन्याचे दागिने देत असताना मात्र ‘तुम्ही घेतलेले दागिन्यावर आम्हाला बक्षिसाचे कुपन देता येत नाही’,हे लकी ड्रॉ कुपन बक्षिस योजना तुम्ही घेतलेल्या दागिन्यावर लागू नाही’, असे म्हणून पंचवीस हजार रूपये खर्च करून बक्षिसाचे अपेक्षेने आकर्षक बक्षिसे असलेल्या लकी ड्राॅ योजनेतून आपणाला बक्षिस लागेल या अपेक्षेने या सराफपेढीमध्ये गेलेल्या ग्राहकांची घोर निराशा होत आहे.
लकी ड्रॉ मध्ये आपणाला कोणतेतरी बक्षीस मिळेल, या अपेक्षेने अनेक ग्राहकांंनी या नामांकित सराफ पेढीमधून सोन्याचे,चांदीचे दागीने खरेदी केले. रूपये दहा हजारचे सोन्याचे दागिने व रूपये पाच हजाराचे चांदीचे दागीने खरेदी करणारांना कुपन देऊ, अशी मोठमोठी जाहीरातबाजी करणारे या नामांकित सराफ पेढीमधून रूपये पंचवीस हजाराचे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांने बावीस कॅरेटची पिळ्याची अंगठी खरेदी केली, म्हणून त्यांना लकी ड्रॉ योजनेचे कुपन दिले नाही.
जत शहरातील नामांकित सराफ व्यावसाईक असलेल्या या व्यावसाईकांकडून लकी ड्राॅ योजनेच्या नावाखाली मोठी फसवणूक चालू असून या व्यावसाईकांकडून लकी ड्राॅ च्या जाहीरातीवर दहा हजार रूपयाचे सोने व पाच हजार रूपयांच्या चांदी खरेदीवर आकर्षक अशी बक्षिसे असलेल्या लकी ड्रॉ ची जाहीरातबाजी सुरू केली. लकी ड्रॉ चे कुपन मिळण्याच्या अपेक्षेने या नामांकित सराफ पेढीमधून सोने खरेदी करणारे ग्राहकांची फसवणूक झालीची चर्चा जत शहरांमध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन