
संजय हुलगे/माळशिरस तालुका प्रतिनिधी:
माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सदानंद श्रीरंग बडवे हे हनुमान शिक्षण प्रसारक माळशिरस , गोपाळराव देव प्रशाला व ज.चं.आगाशे कनिष्ट महाविद्यालयात उपमुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. 31 वर्षे एवढी अध्यापन सेवा चोख बजावली. त्यांचा शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचेकडून सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला .
कैलासवासी विष्णुपंत कुलकर्णी उर्फ अण्णा काका तसेच अॅड . मिलिंद कुलकर्णी सचिव
उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य म्हणून ग्राहक संरक्षण क्षेत्रात 1993 पासून कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवार असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेत तालुका संघटक, जिल्हा अध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य केले.सन 1993 मध्ये माळशिरस येथे ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू केले व ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्रातून असंख्य ग्राहकांना त्यांच्या तक्रारीविषयी मार्गदर्शन केले. अण्णा उर्फ विष्णुपंत कुलकर्णी यांच्या प्रेरणेने सामाजिक कार्यामध्ये मी प्रवेश केला.यापुढेही ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्य करणार असे सदानंद बडवे म्हणाले.
ज्या शाळेत अध्यापन चांगल्याप्रकारे करुन शाळेची गुणवता चांगल्याप्रकारे टिकवुन ठेवल्याबद्धल शाळेतील शिक्षकांच्या वतीने गोपाळराव देव प्रशालेमध्ये माजी प्राचार्य आर एस ढाले यांचेकडून सदानंद बडवे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला . अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा माळशिरस यांच्यावतीने उपमुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याने सदानंद बडवे यांचा सत्कार माळशिरस तालुका उपाध्यक्ष वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कुलकर्णी यांचा सत्कार प्रशालेच्या प्राचार्या केस्कर यांचे हस्ते करण्यात आला .सह प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती