महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो.ची बैठक संपन्न!

हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे प्रलंबित विषयासंदर्भात काढणार मोर्चा!
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :

राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेची अमरावती विभागीय बैठक शासकीय विश्रामगृह अमरावती येथे सोमवारी विविध विषयांवर चर्चा करत संपन्न झाली.
बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नारायणराव ढवळे पाटील होते.राज्य प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड पाटील, विदर्भ उपाध्यक्ष प्रफुल्ल गुल्हाणे पाटील, विदर्भ महासचिव प्रा.टी.बी.रामटेके पाटील, अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष निरंजन पारवे पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष सागर खोंडे पाटील, वाशिम जिल्हा समन्वयक उमेश देशमुख पाटील, अमरावती जिल्हा महिला अध्यक्ष राखी रिठे पाटील, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष बब्बुजी अजनेरीया पाटील,कमलसिंग वाघमारे, नितीन गोरले पाटील,गोपाल चव्हाण पाटील जेष्ठ मार्गदर्शक, प्रदिप राऊत पाटील प्रसिद्धी प्रमुख उपस्थित होते.
अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा असलेल्या या बैठकीत पुढील महिन्यात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.याबाबत पोलीस पाटील यांच्यात नवचैतन्य निर्माण करुन सर्व पोलीस पाटील एक करण्यात यावे अशा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच बैठकीत पोलीस पाटील यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सुरेखाताई ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवत पुन्हा पोलिस पाटील हितासाठी पुढाकार घेणार असल्याचे मत व्यक्त केले.
बैठकीस उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस पाटील व पदाधिकारी यांनी चर्चात्मक मनोगत व्यक्त केले. बैठकीचे संचालन विशाल मोहेकर यांनी तर आभार प्रदर्शन अमरावती जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष संदीप पाटील सोळंके यांनी केले.
अमरावती विभागीय बैठकीस अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीचे यशस्वी आयोजन अमरावती जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर बोंडे पाटील, जिल्हा निमंत्रक संजय बुरंगे पाटील यांनी केले. बैठकीस प्रामुख्याने मीरा मानके,सौ.वंदनाताई ठाकरे,छाया वानखडे,किरण गेडाम,अंंजली निंघोट, विनोद तायडे, ज्ञानेश्वर कटके, सुनिल ठाकरे, अंबादास चवरे, गजानन उईके, चंद्रकुमार राणे,अमोल खांडे, श्रीकृष्ण रहाटे, संतोष वानखडे, एकनाथ ठवरे, सदाशिव चव्हाण, गजानन रोकडे,रामुतारा आकवा, पांडुरंग खडके, श्रीनिवास तायडे, दिपक पिंपळकर,अजय मोहकर, सचिन सोळंके सह अमरावती विभागातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.