
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कामेरी:
विठ्ठलवाडी (कामेरी) ता.वाळवा येथे ‘प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच’ या प्रस्तावाअंतर्गत जीवनगौरव अभियान या फलकाचे उद्घाटन अभियानाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात फलकास पुष्पहार व श्रीफळ वाढवून केली. यावेळी अर्थक्रांती सांगली जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, वाळवा तालुका अर्थक्रांती चे सचिव आर.एन.मोहिते, सांगली जिल्हा अर्थक्रांतीचे कायदेशीर सल्लागार किरण पाटील, सांगली जिल्हा बांधकाम कामगार अध्यक्ष श्रीनिवास गायकवाड, वाळवा तालुका अध्यक्ष सागर चव्हाण, अर्थक्रांतीचे विठ्ठलवाडीचे अध्यक्ष बजरंग दिंडे, सचिव गणेश पवार, सल्लागार बाबुराव बारपटे, उपाध्यक्ष गुलाब महंमद मुल्ला, विठ्ठलवाडी गावचे सरपंच हंबीरराव बारपटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियानाचे वाळवा तालुका सचिव आर.एन.मोहिते यांनी केले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार गावातील बाबुराव बारपटे, दिलीप जाधव यांच्या हस्ते केला. याप्रसंगी चंद्रशेखर मोरे यांनी अभियानाची ओळख करून दिली. अभियानाचे कायदेशीर सल्लागार अँड.किरण पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी व त्यावर कायदेशीर तरतुदी उदाहरणासह सांगितल्या. जिल्ह्यातील ज्येष्ठांचे कायदेशीर लढाईचे काम ते विना मोबदला करतात.
याप्रसंगी संघटनेचे तालुका कोषाध्यक्ष हनुमंतराव पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माहितीचे सविस्तर विवेचन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी जेष्ठ नागरिक देशाची राष्ट्रीय संपत्ती म्हणून शासनाने जाहीर करावे, ज्याप्रमाणे मोर राष्ट्रीय पक्षी आहे, वाघ राष्ट्रीय प्राणी आहे, यांना जसे राष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, त्याप्रमाणे ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. त्यांना दरमहा मासिक दहा हजार रुपये सन्मानधन द्या, त्यांना प्रतिष्ठेने जगता यावे, यासाठी त्यांचे वेगळे मंत्रालय करा, त्यांना आरोग्य, संरक्षण ,वाहतूक व कायदा व्यवस्था इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून द्या, असे संबोधित केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार सुभाष दिंडे यांनी मानले. याप्रसंगी सुप्रसिद्ध प्रवचनकार बाबासाहेब पाटील, बांधकाम कामगार संघटनेचे दत्ता जाधव, अविनाश गायकवाड, वाळवा तालुका अर्थक्रांती चे सदस्य डी.पी.सावंत, तानाजी पाटील व शंकर कदम उपस्थित होते. कार्यक्रमास ज्येष्ठ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती