माडगुळेत कर्जाला कंटाळून गळफास घेऊन एकाची आत्महत्या

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :

माडगूळे येथील प्रशांत उर्फ बाबूराव भालचंद्र विभुते (वय ३९ वर्षे) यांनी कर्जाला कंटाळून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीजवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.
या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस गावडे करीत आहेत.