मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावे, याबाबत आटपाडी एसटी आगारातील कामगारांचे आंदोलन सुरू आहे.यास सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. धनंजय पाटील यांनी भेट दिली व कोणत्याही कर्मचारी यांनी आत्महत्या करू नये, आंदोलन कायदेशीर मार्गाने करावे, असे यावेळी सांगितले. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यामार्फत आपण राज्यशासनाशी चर्चा करून मार्ग काढावा व प्रवाशांची गैरसोय टाळावी, असेही यावेळी ॲड. धनंजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना सुचवले. तसेच सनदशीर आंदोलन सुरू असताना जर कर्मचाऱ्यांवर केसेस दाखल झाल्यास त्या विनामूल्य लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी व प्रकाश मरगळे तसेच सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती