अनिल मदनेः
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
दिवाळीच्या आगमणाने जत शहरातील बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. शहरातील दुकाने फुलली आहेत. रेडिमेड कापडासह फराळाच्या साहित्याला लोकांची मागणी वाढली आहे.
कोरोनाचे सावट कायम असताना नवरात्रोत्सव सामान्यांसाठी नवउत्साह घेऊन आला, तोच उत्साह दिवाळी कायम असणार आहे.वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वस्तूंचे भाव वाढल्याची प्रतिक्रिया सामान्य वर्गातून मिळत आहे.खासकरून महिला वर्गाला लागणाऱ्या पूजासाहित्यांचे भावसुध्दा वाढल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या साहित्यांचे स्टॉल बाजारात सजले आहेत.दिवाळीकरिता लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचे साहित्य म्हणजे ‘केरसुणी’.ही लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची मानली जाते.दिवाळी खरेदीची सुरुवात करताना सर्वात प्रथम खरेदीचा मान या केरसुणीला मिळतो,तशी प्रथा आहे.मात्र,यंदा केरसुणीच्या किंमती वाढल्याने लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी महागली अशी प्रतिक्रिया महिला वर्गाकडून येत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती