पत्रकार निनाद पाटील कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

संजय हुलगे/ माळशिरस तालुका प्रतिनिधी:

माळशिरस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक व दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी निनाद पाटील यांना  ‘कोवीड योद्धा ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये जाणीवजागृती करून सक्षमपणे कर्तव्य बजावल्याबद्दल अकलूज येथील एकता बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ‘कोवीड योद्धा ‘ हा पुरस्कार  समारंभपूर्वक अकलूज येथे शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते – पाटील यांच्या हस्ते  देण्यात आला.