
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील व भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार सामतीचे सभापती मदनसिंह मोहिते – पाटील , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,भारतीय जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा बाळासाहेब सरगर, सभापती शोभाताई साठे , पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या संगिताताई मोटे , माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते -पाटील, , मानशिंग आप्पा मोहिते, राहुल बापू वाघमोडे, नानासाहेब नाईकनवरे , प्रकाश पाटील , दत्तात्रय भिलारे , धर्मराज माने , संग्राम रननवरे , वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहीते , पशुधन विकास अधिकारी डॉ.अविनाश रेडे – पाटील उपस्थित होते .
आयुष्यमान भारत योजनेच्या कार्यक्रमात पंचायत समितीच्या व आरोग्य विभागाच्या माध्यमातून विमा कवच दिले असून केंद्र सरकारने नागरिकाला 5 लाख रुपयाचे आरोग्य हेल्थ कवरेज मिळणार आहे . केंद्र सरकारने आरोग्य सुविधेवर भर दिलेला आहे. कोरोनाची परस्थिती जसजशी आटोक्यात येत आहे, तसे केंद्र सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या विविध योजना लाभ देण्यासाठी सुरु केलेल्या आहेत. या सुरु केलेल्या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राम सातपुते यांनी केले. या कार्यक्रमामध्ये प्रतापराव पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील या़नी केले. आभार गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांंनी मानले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती