गोरडवाडी-इस्लामपूर १.५० कोटींच्या रस्ताकामांचा शुभारंभ!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

गोरडवाडी-इस्लामपूर या १ कोटी, ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील व भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,जेष्ठ नेते गणपतराव तात्या वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर,भारतीय जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा बाळासाहेब सरगर,पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील,जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील,माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, मानशिंग आप्पा मोहिते,राहुल बापू वाघमोडे,शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास करणे,संचालक शिवामृत संघ लक्ष्मण तात्या पवार ,कैलास पवार,मच्छिंद्र कर्णवर,उपसरपंच दिपक गोरड ,बाळासाहेब कर्णवर,लक्ष्मण गोरड,नवनाथ कर्णवर, नानासाहेब हुलगे, शंकर यमगर,विजय गोरड,धर्मराज माने, साहेबराव कर्णवर,रावसाहेब कर्णवर,आबा पिंगळे, पोलीस पाटील नानासाहेब यमगर,सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता एस.टी.डाके,शाखा अभियंता गोंविद कर्णवर पाटील, जितमल पलाडीया , कनिष्ठ अभियंता के.डी.माने,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुहास देशमुख, ग्रामसेवक रविंद्र पवार सह गोरडवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायत गोरडवाडी व इस्लामपूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सुर्यवंशी यांनी केले.
गोरडवाडी ते इस्लामपूरमधून गोरडवाडीकडे दळणवळण करण्यासाठी दोन्ही गावातील माणसांना पावसाळ्यामध्ये जाता येत नव्हते. शाळेतल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून जावे लागत असत.गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता व्यवस्थित नसल्याने माणसांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे इथून पुढे रस्त्याचा प्रश्न सुटला.