अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांचे निर्देशाप्रमाणे दिनांक २ ऑक्टोबर १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करणेचे असलेने विविध कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करणेबाबत कळविले आहे. जत तालुका विधी सेवा समितीमार्फत असंघटीत मजूर योजनेबाबचे शिबीर अंत्राळ ता.जत येथे आयोजित करणेत आले होते.
जत तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष ए. बी.जाधव अध्यक्षस्थानी होते.जत तालुका विधीज्ञ संघटनेचे सदस्य एस.जी.माळी व आर.एस.शिंदे हे कार्यक्रमास हजर होते.
या कार्यक्रमात असंघटीत कामगारांच्या हक्काविषयी व कायद्याविषयी मान्यवरांनी माहीती दिली. या कार्यक्रमास जत न्यायालयीन व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावात मोफत कायदेविषयक माहीतीबाबतच्या प्रसिध्दीपत्रकांचेही वाटप करणेत आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन