अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुक्यातील उमराणी या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान उमराणी यांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले.
या कामी धारकऱ्यांनी, शिवपाईकांनी, महिलांनी आणि विशेष म्हणजे लहान मुलांनी सहभाग दर्शवला होता. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हेच राष्ट्रीयत्व हिंदू च्या आजच्या तरुण पिढीच्या रक्तात असून भरून यांच्या देशभक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्याचे काम म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अतिशय प्रेरणादायी उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड! आज दौडीची सांगता होती.
डफळे सरकार राजवाड्यासमोर ध्वजाचे पूजन करून येथून दौडीचा प्रारंभ झाला. गावच्या प्रमुख रस्त्यावरून प्रत्येक देवतांचा आशीर्वाद घेत असताना गावातील माता-भगिनींनी मोठ्या उत्साहात गल्लीगल्लीत ध्वजाचे पूजन केले.
कार्यक्रमाचा सांगता समारंभ श्री हिंदवी स्वराज्य सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकमध्ये पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी गावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक डॉ. श्रीवर्धन शिंदे, शाहूराजे डफळे सरकार ,यल्लाप्पा अभंगे यांनी दौड संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच आणि उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन