
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
नवतरुण पिढीने उद्योगाकडे वळावे, असे मत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.
सांगोला येथे अमोल(शेठ) विभुते यांच्या माडगूळकर स्टील ट्रेडर्सच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. राणीताई कोळवले, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, आटपाडी मार्केट कमिटीचे सदस्य ऋषिकेश देशमुख, माडगूळचे माजी सरपंच संजय विभुते, आदि मान्यवर उपस्थित होते.
अमोल विभुते यांनी तीन वर्षांपूर्वी सांगोला येथे माडगूळकर ज्वेलर्स हा फर्म सुरू करून दुसऱ्या वर्षात त्यांनी माडगूळकर ट्रॅक्टर्सचे शोरूम चालू केले. त्या पाठोपाठ लगेचच मंगळवेढा येथेही माडगूळकर ट्रॅक्टरचे शोरूम चालू केले. आता त्यांनी सांगोला येथे माडगूळकर स्टील ट्रेडर्स हा फर्म सुरू केला. त्यांनी थोड्याच दिवसाच्या कालावधीत माडगूळकर उद्योग समूह नावारूपाला आणला.अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती